6 July 2020 4:49 AM
अँप डाउनलोड

मी स्वत: देखील राणेंच्या संपर्कात आहे; भुजबळांकडून राणेंची खिल्ली

Minister Chhagan Bhujbal, MP Narayan Rane

नाशिक: महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भारतीय जनता पक्ष कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले होते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तसेच संधी न मिळाल्याने शिवसेनेत मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याचे समोर आले होते. तर याच मुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील निष्ठावंताना डावलून उपऱ्याना संधी देण्यात आली असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला होता.

दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत खासदार नारायण राणे यांची खिल्ली उडवली आहे. ठिकाय, मी आनंदी आहे. मी स्वत: सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे. मग आता काय करणार. एकमेकांशी बोलतो, सगळे संपर्कात आहेत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

Web Title:  Minister Chhagan Bhujbal criticized MP Narayan Rane over Mahavikas Aghadi MLAs unhappy statement.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(8)#Narayan Rane(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x