25 September 2020 10:33 PM
अँप डाउनलोड

झेंड्यावरील राजमुद्रेवरून राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस...पण!

Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra, MNS party New Flag, State Election Commission, Raj Thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रे संदर्भातील दाखल तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर राजमुद्रा आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडसह अन्य काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नोटीस पाठवली असून पक्षपातळीवर यावर तोडगा काढण्याची सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यामुळे संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि जय हो फाऊंडेशनने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या नव्या झेंड्याला विरोध दर्शविला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केली. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती. याविरोधात संभाजी ब्रिगेडने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मनसेला योग्य ती कार्यवाही करण्याची नोटीस बजावली आहे.

या नोटीसबाबत बोलताना मनसेचे नेते शिरीष सावंत म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाचं हे पत्र आम्हाला मिळालं आहे. त्यांना आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्राची कॉपी पाठवणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. जर केंद्र निवडणूक आयोगाच्या कक्षेत ही बाब येत नसेल तर साहजिकच राज्य निवडणूक आयोगाच्या अख्यारित हा विषय नाही. देशाच्या झेंड्याबाबत जे नियम आहेत त्याचे सर्वांना पालन करावं लागतं असं त्यांनी सांगितले आहे.

 

Web Title: State Election Commission issues notice to Raj Thackerays MNS Party over new flag using Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(638)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x