सुशांतच्या केसमध्ये कुठेतरी आदित्य ठाकरेंचं नाव असल्याने राज्य सरकार CBI कडे वळवणार नाही
मुंबई, ३० जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले होतं. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला होता.
ट्विटरच्या माध्यमातून तिने हा मोठा खुलासा केल्याचं निदर्शनास येत आहे. ‘मुंबई पोलीस स्पष्टपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पण करण जोहरला नाही. त्याच्या ऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का?’ साहेबांना त्रास होवू नये का? असा प्रश्न यावेळी तिने उपस्थित केला होता.
‘समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा व दुजाभाव कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलाच्या बेस्ट फ्रेन्डच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?, असे कंगनाने दुस-या ट्वीटमध्ये म्हटले होते.
सुशांतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते आणि तसं झालं देखील. त्यानंतर करण जोहरला देखील चौकशीसाठी याच आठवड्यात बोलाविण्यात येणार आहे असं वृत्त आलं.
Filmmaker Karan Johar’s (in file photo) statement will be recorded this week in the Sushant Singh Rajput case: Mumbai Police pic.twitter.com/YvhIRlF9Hm
— ANI (@ANI) July 27, 2020
मात्र आता भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट करत गंभीर शंका उपस्थित केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “MVA आघाडी सुशांत सिंग राजपूत ची केस CBI कडे वळवणार नाही कारण अशी पण अफवा ऐकायला मिळते आहे की आदित्य च नावं कुठेतरी आहे त्या मध्ये कदाचित म्हणून . काल स्वतःहून CM…DCM ना भेटले. काही तरी वेगळं शिजतंय नक्की. ह्या मध्ये कोण कोण आहे ते CBI कडे केस गेल्याशिवाय कळणार नाही.
MVA आघाडी सुशांत सिंग राजपूत ची केस CBI कडे वळवणार नाही कारण अशी पण अफवा ऐकायला मिळते आहे की आदित्य च नावं कुठेतरी आहे त्या मध्ये कदाचित म्हणून काल स्वतःहून CM…DCM ना भेटले. काही तरी वेगळं शिजतंय नक्की. ह्या मध्ये कोण कोण आहे ते CBI कडे केस गेल्याशिवाय कळणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 30, 2020
News English Summary: After the suicide of actor Sushant Singh Rajput, the controversy over the dynasty in Bollywood seems to be burning well. The main thing is that in the midst of this controversy, actress Kangana Ranaut had now dragged the state’s environment minister and Shiv Sena leader Aditya Thackeray.
News English Title: Former MP Nilesh Rane commented into Sushant Singh Rajput suicide case and connection with minister Aaditya Thackeray News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट