14 December 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

पुण्यात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी लवासा ताब्यात घ्या - खा. गिरीश बापट

BJP MP Girish Bapat, Lavasa city, Huge Covid 19 Care Centre, Pune Mulashi

पुणे, ३० जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक भरली. काल पुणे जिल्ह्यातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या एकूण ३,३७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुण्यात एकाच दिवसात इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोना रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच घटना आहे. पुण्याच्यादृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.

त्यामुळे आता पुण्यातील कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५० हजारावर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७८०१३ इतका आहे. बुधवारी पुणे महानगरपालिका क्षेत्रात १,४५८ नवे रुग्ण आढळले. मुंबईपेक्षा पुण्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने सध्या चिंतेचे वातावरण आहे. पुण्यात १५ ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या २ आठवड्यात किमान २ हजार आयसीयू आणि १ हजार व्हॅन्टिलेटरची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यातली कोरोना परिस्थिती, त्यावरून रंगलेलं राजकारण, भाजपने यासंदर्भात केलेले आरोप, हे सगळं पाहता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते खासदार गिरीश बापट यांनी लवासामधील जागा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. पुणे मिररनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लवासामधील जागा सध्या रिक्त आहे आणि करोनाविरोधातील लढ्यात या जागेचा वापर करता येई शकतो. शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि अन्य मालमत्ता आपण ताब्यात घ्याव्यात अशी मी विनंती करत आहे. रुग्णांसाठी बेड्स आणि करोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो, असं बापट यांनी पत्रात नमूद केलं आहे.

 

News English Summary: The space in Lavasa is currently vacant and could be used in the fight against the Corona. I urge you to take possession of the hospitals, hotels and other properties in the city. We can create beds for patients and all the facilities needed to fight corona, ”Bapat said in the letter.

News English Title: BJP MP Girish Bapat Suggests Turning Lavasa city Into A Huge Covid 19 Care Centre To Tackle Virus Pune Mulashi News Latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x