1 May 2025 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

भाजपकडून बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस | हाच योगायोग - धनंजय मुंडे

Minister Dhananjay Munde, Sharad Pawar, Parth Pawar, Devendra Dadnavis, Bihar Assembly Election

मुंबई, १४ ऑगस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची नाराज अजूनही कायम असल्याचं दिसतंय. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवार आता कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पार्थ प्रकरणात पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

एरवी थांबून माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणा-या सुप्रिया सुळे यांनीही आज पवारांसोबतच्या बैठकीनंतर मौन बाळगले. कुठलीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्यात. तर, कुणीही नाराज नाही, अजित पवार त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितलं. तर, धनंजय मुंडे म्हणाले, अजित पवार नाराज असण्याचा प्रश्नच नाही. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित चर्चा झाली. असे मुंडे म्हणाले. अजित पवार नाराज नाहीत, काही झाले नाही अशी प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली.

तर धनंजय मुंडे म्हणाले, “आज झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. बैठकीत केवळ सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांगाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अजित पवार देखील नाराज नाहीत.” देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतसिंग प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर त्यांना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना हाच योगायोग असल्याचं म्हटलं. यावेळी बोलताना त्यांचा चेहऱ्यावरील हावभाव आणि योगायोग या शब्दावर जोर बरेच संकेत करत होता. यातून धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. त्यात भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यातूनही देवेंद्र फडणवीसांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं बोललं जात आहे.

 

News English Summary: BJP has been given a big responsibility to former Maharashtra Chief Minister and BJP leader Devendra Fadnavis for Bihar Assembly polls and he is going to play a “crucial” role in the election. The senior leader also participated in a core committee meeting of the Bihar BJP through a video conference from Mumbai on Thursday.

News English Title: Minister Dhananjay Munde on Sharad Pawar Parth Pawar Devendra Dadnavis Bihar Assembly Election News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या