12 December 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यविषयक ज्ञानाचं कौतुक | पण WHO'च्या नादाला लागूनच कोरोना वाढला - राऊत

ShivSena, MP Sanjay Raut, Coronavirus Spread, WHO Responsible

मुंबई, १४ ऑगस्ट : शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी असल्याची कोणतीही शंका आता कोणाच्याही मनात राहिली नसावी. कोरोनासारख्या जग व्यापणाऱ्या संकटावरही त्यांच्याकडे उपाय असावा. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी ‘वादळी’ मुलाखत त्यांनी घेतली त्यात जागतिक आरोग्य संघटनाही कोरोनासंदर्भात आपला सल्ला घेईल, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तारिफ केली होती. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजब वक्तव्य केलं आहे.

“जागतिक आरोग्य संघटनेच्या नादालाच लागून करोना वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेत इतूनतिथून गोळा केलेली लोकं आहेत. नुकतीच रशियाची लस आली. जागतिक आरोग्य संघटना त्यांच्या विरोधात बोलली. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या मुलीला ती लस दिलीच,” असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. धारावीमध्येही आता करोनाची परिस्थितीत नियंत्रणात आहे. मुंबईतही करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर त्यामुळे त्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

 

News English Summary: Corona has risen in line with the World Health Organization. The World Health Organization has a collection of people from all over. Russia was vaccinated recently. The World Health Organization spoke out against them. But Russian President Putin gave his daughter the vaccine, “Raut said.

News English Title: Shiv Sena Leader Sanjay Raut Criticize Who They Are Responsible For Coronavirus Spread Cm Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x