12 May 2025 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

किरीट सोमैयांचे व्हिडिओ नाहीत, असं ही ते काय बोलतात ते समजणार नाही

MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019, Kirit Somaiya, BJP

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भांडुप येथे जाहीर सभा झाली. यावेळी देखील त्यांनी नरेंद्र मोदी यांना विशेष लक्ष केलं. दरम्यान, सभेला संबोधित करताना त्यांनी महागाई या सामान्यांशी निगडित विषयाला हात घालून भाजपला कोंडीत पकडलं. यावेळी त्यांनी गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव यावरून भाजप नेत्यांचे पूर्वीचे व्हिडिओ जनतेला दाखवले.

परंतु सभे दरम्यान ईशान मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांचा विषय निघाला आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची मोजणारे खासदार आता अनेक वर्षांपासून गायब असल्याची टीका केली. त्यावेळी उपस्थितांना वाटलं आता किरीट सोमैयांचे देखील व्हिडिओ लागणार, पण राज ठाकरे यांनी लागेचच माझ्याकडे किरीट सोमैयांचे व्हिडिओ नाहीत आणि तसं ही ते काय बोलतात ते समजणार सुद्धा नाही असं म्हणत त्यांची अप्रत्यक्ष खिल्ली देखील उडवली आणि उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या