12 February 2025 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

लोकल रेल्वे प्रवास | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्रं दिलं होतं | आज मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार

Raj Thackeray

मुंबई, ०९ ऑगस्ट | मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल. तसेच सामन्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी काही अटींवर मान्यता दिली आहे.

दरम्यान, आपल्या आंदोलनामुळे सरकारने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगत मनसेने मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे लोकलच्या श्रेयावरून विरोधकांमध्येच चढाओढ सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने ट्विट केलं आहे. ‘मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे,’ असं ट्विट मनसेने केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS party thanks to CM Uddhav Thackeray over announcement of Mumbai local train services to resume news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x