मुंबई, २३ जून | महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास 297 कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे. प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
गोरेगावच्या पत्राचाळीचा विकास:
मुंबईच्या गोरेगांवमधील पत्राचाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहेत. कालबद्ध पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. याबाबत स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
सन 2008 पासून रखडलेला सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) याच्या पुनर्विकासाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतली. 672 मूळ रहिवाशांना पुढच्या 2 वर्षांत घरे मिळतील. गोरगरीबांची सेवा करण्याची ही संधी मला मिळाली. लवकरात लवकर ते त्यांच्या घरात जातील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईन.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 23, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Mumbai Giregaon Patra Chawal MHADA redevelopment approval in state cabinet meeting news updates.
