23 March 2023 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

VIDEO | समीर वानखेडेंच्या मुलांचे फोटो मलिक यांनी शेअर केलेले नसताना वानखेडेंची खोटी माहिती

Sameer Wankhede

मुंबई, 01 नोव्हेंबर | NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी मोठी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दाही नवाब मलिकांनी मीडियासमोर आणला. या सर्व घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग (Sameer Wankhede) आयोगाकडे आपली तक्रार केली आहे.

Sameer Wankhede. While Nawab Malik has never shared photos of Sameer Wankhede’s children on social media, he has given false information to Arun Haldar :

मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी काल समीर वानखेडेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्येही सविस्तर चर्चा झाली असून हलदर यांनी नवाब मलिकांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलंय. एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यामागे नवाब मलिक का लागले आहेत हे कळायला हवं असं हलदर म्हणाले आहेत. माझ्या अनुभवावरुन समीर वानखेडे यांनी दाखवलेलं जात प्रमाणपत्र योग्य असल्याचंही हलदर यांनी सांगितलं होते.

समीर वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन समीर वानखेडेंना लवकरच तुरुंगात पाठवणार अशी घोषणा केली होती. इतकच नव्हे तर समीर वानखेडे हे बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर प्रशासकीय सेवेत लागल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. विशेष म्हणजे याभेटीत समीर वानखेडे स्वतःच्या बचावासाठी खोटी माहिती देतं आहेत असं देखील दिसून येतंय. विशेष म्हणजे त्यांनी ही खोटी माहिती स्वतःच्या मुलांच्या बाबतीतच दिली आहे. नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर समीर वानखेडेंच्या मुलांचे फोटो कधीही शेअर केलेले नसताना त्यांनी त्यासंबंधित खोटी माहिती अरुण हलदर यांना दिली आहे. विशेष म्हणजे त्यांची खोटी माहिती पसरवण्याचं अजून एक उदाहरण व्हिडिओ रेकॉर्डमध्ये आलं आहे. त्यामुळे स्वतःची नोकरी वाचविण्यासाठी समीर वानखेडे सर्व भावनिक मुद्दे पुढे रेटत असल्याची चर्चा आता माध्यमांमध्येच रंगली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sameer Wankhede shared wrong information with Arun Haldar.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x