27 April 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार: तेजस ठाकरे

Save Aarey, Save Forest, Save Animals, Tejas Thackeray, Aditya Thackeray

मुंबई: ‘कोणत्याही परिस्थितीत आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक पर्यावरण प्रेमी या लढाईत एकत्र आले आहेत’, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या प्रचार रॅलीत ते सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया साधत असताना त्यांनी आरे वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली.

आरे येथील वृक्षतोडीवरुन खुप मोठा गदारोळ झाला. मेट्रो प्रकल्पासाठी आरे येथील २६४६ झाडे तोडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकारण समितीने घेतला होता. त्यानुसार आरेतील जवळपास २ हजार झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडू नये, यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलने केली. या लढाईत आदित्य ठाकरे देखील उतरले. त्यांनी समाज माध्यमांवर वृक्षतोडीवर टीका केली. त्यामुळे भाजप सरकार सोबत महायुतीत करुन सत्तेत राहणाऱ्या शिवसेना पक्षाची आरेबाबत नेमकी भूमिका काय आहे? असा सवाल अनेकांना पडत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणावर निवडणुकीनंतर बोलू, असे स्पष्ट केले. त्यानंतर आता आरे संदर्भात तेजस ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आरे जंगल वाचवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

तसेच १२४ जागा आम्ही लढवतोय असं नाही तर आम्ही महायुतीत निवडणुका लढवित आहोत. वरळीत सर्वाधित मताधिक्याने आदित्य ठाकरे निवडून येणार आहेत. मी सध्या राजकारणात नाही, जे जे शिवसैनिक महाराष्ट्रात फिरतात हे प्रेम असचं राहू द्या. येत्या २४ तारखेला महाराष्ट्रात भगवा फडकणार आहे असा विश्वासही तेजस ठाकरेंनी व्यक्त केला.

दरम्यान, माझं वन्यजीवांवर संशोधन सुरु आहे, प्रत्येकाने आपापल्या परिने समाजासाठी काम केलं पाहिजे. निवडणुका सारख्या सुरुच असतात, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा प्रत्येकवेळी निवडणुकीचं वातावरण कुटुंबात नसतं, मनमोकळ्या गप्पा आम्ही कुटुंबात मांडतो असंही तेजस ठाकरेंनी सांगितले.

तेजस ठाकरे हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर दिसून येतात. आदित्य ठाकरे निवडणुकीची घोषणा करतानाही ते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे येणाऱ्या काळात तेजस ठाकरेही राजकीय मैदानात उतरणार का? अशीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी तेजस ठाकरे हे त्यांच्या स्वभावाचे आहेत. तेजसचा उल्लेख करताना बाळासाहेबांनी तोडफोड सेना म्हणून केला होता. त्यामुळे तेजस ठाकरेंविषयी शिवसैनिकांच्या मनातही उत्सुकता आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x