12 December 2024 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? | आ. शेलार यांचा सवाल

Arnab Goswami arrest, BJP MLA Ashish Shelar, Minister Aaditya Thackeray

मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. त्यात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून पुन्हा भारतीय जनता पक्षातील नेत्यांना अग्रलेखाद्वारे लक्ष केल्याने भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

याच प्रकरणावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं आहे. आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर तिखट शब्दात टीकास्त्र सोडलं आहे.

या संदर्भात ट्विट करताना आ. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, “रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी…,” असा इशारा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

“त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?,” असं टीकास्त्र आमदार शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर डागलं आहे.

News English Summary: After the arrest of Arnab Goswami, the editor of Republic TV, the Bharatiya Janata Party and the Shiv Sena have a good political feud in the state. Today, Shiv Sena MP Sanjay Raut again addressed the BJP leaders through a front page article and the BJP leaders have also started replying. BJP MLA Ashish Shelar has drawn the attention of Sanjay Raut and Environment Minister Aditya Thackeray on this issue. BJP MLA Ashish Shelar tweeted harshly against Raut, Aditya Thackeray and Mumbai Police Commissioner Paramvir Singh.

News English Title: Arnab Goswami arrest BJP MLA Ashish Shelar again target Aaditya Thackeray News Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x