2 May 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले, मुंबईत आमदारांची बैठक बोलावली

NCP, Sharad Pawar, Loksabha Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वृत्त आहे. शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच वरून राजाचं आगमन होणार असून, त्या काळात पक्ष विस्ताराची कामं हाती घेणं कठीण काम असतं. त्यात पावसाचा ३-४ महिन्याचा कालावधी संपताच लगेचच विधानसभा निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपत नाही तोच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या या बैठकीला लोकसभा लढवलेल्या उमेदवारांना देखील बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला जाणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या