महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पोलिसांच्या टीमने रश्मी शुक्लांचा हैदराबादेतील निवासस्थानी जबाब नोंदवला
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | …तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन, संभाजीराजे छत्रपती आक्रमक
राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे तोडणारे कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत - आ. भाई जगताप
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना राजकीय वर्तुळात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सूरु आहेच. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती संभाजीराजेंच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे - काँग्रेस
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटले का नाही यावर देखील पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अजब | राज्य सरकार देत असलेल्या मोफत लसीवर मुंबई भाजपची लोकांना 'मोफत लस ऑफर'
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला होता. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय २८ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत 24-26 मे थेट वॉक-इन व्दारे लसीकरण तर 27-29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणीव्दारे
कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ववत सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक आगळावेगळा पॅटर्न सुरू केला आहे. यानुसार 24 ते 26 मे म्हणजे सोमवार ते बुधवार असे 3 दिवस लसीकरण हे थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांसाठीच असणार आहे. लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये 20 टक्के पहिल्या डोससाठी तर 80 टक्के लसी ह्या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र लॉक टू अनलॉक? | एकूण ४ टप्यात असू शकतो राज्य सरकारचा प्लॅन
मागील दीड-दोन महिन्यांपासून कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी जून महिना आनंदाची झुळूक घेऊन येणारा ठरणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसतो आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तिसरी लाट | लहान मुलांना कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवता येईल यासाठी मुख्यमंत्री सतर्क | महत्वाच्या बैठका
देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे. यातच आता तज्ञांकडून कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशातील 35 टक्के लोक तिसऱ्या लाटेच्या विळ्याख्यात येत असून याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाल आयोगाने प्रत्येक राज्यांतील आयसीयू बेडसह 22 उपकरणांचा डेटा मागितला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल सचिवालयाकडे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची यादीच नाही | RTI'ने धक्कादायक माहिती
मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजब | केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी या मागणीवरूनही राष्ट्रपती राजवटीची मागणी
तौते चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
त्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय कधी घेणार आहात? | हायकोर्टाचा राज्यपालांच्या सचिवांना प्रश्न
मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्यावर 24 मे पर्यंत अटकेची कारवाई करू नये - मुंबई हायकोर्ट
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मयुरेश राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांचं पत्रं आणि केंद्रीय मंत्र्यांना फोन | खतांच्या किमती कमी झाल्या | शेतकऱ्यांना पावरफूल दिलासा
देशामध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्याने मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. खतांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहीले होते. पवारांना केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन पवारांना दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
नैसर्गिक आपत्तीतही पंतप्रधांना केवळ गुजरातच दिसतोय, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असंच दिसतंय
अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्युकरमायकोसिस | म. फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार | आरोग्यमंत्र्यांची माहिती
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला असून रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र 34व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के इतके आहे ही राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याच दरम्यान राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व रुग्णांवर उपयार सुरू आहेत आणि मोफत उपचार देण्याच्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | BMC'च्या ग्लोबल टेंडरवला ३ पुरवठादारांकडून प्रतिसाद | स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार
राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
घरोघरी जाऊन वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणास केंद्र BMC'ला मान्यता देत नसेल तर आम्ही देऊ - मुंबई हायकोर्ट
ज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहेेेे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पश्चिम रेल्वे मुंबईत 3591 पदांची भरती | दहावी पास असणाऱ्यांना संधी
Indian railways recruitment 2021. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. Free Job Alert.
4 वर्षांपूर्वी -
पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज (१९ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने कुठे तरी एक पाऊल मागे घेतले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 11 तासानंतर समुद्राच्या जीवघेण्या लाटांमधून सुटका, ONGC कामगार ढसाढसा रडला
प्रचंड वेगाने वाहणारे वारे. खळवलेल्या समुद्र आणि ६ ते ८ मीटर उंचीच्या जीवघेण्या लाटा. अगदी मृत्यूच चाल करून येतोय असं वाटावं. तौते चक्रीवादळ मुंबईपासून जात असताना अरबी समुद्रात हे दृश्य होतं, ‘बॉम्बे हाय’ परिसरातील. तराफ्यांवर असलेल्या लोकांना एकाच वेळी मृत्यूने चौहीबाजूंनी जणू वेढाच दिला होता. त्यात तराफाच भरकटला आणि बुडायला लागला. तराफ्यावरील लोकांच्या पायाखालून जमीनच सरकरली. पण तरीही धीर न सोडता त्यांनी तब्बल ११ तास संकटाशी लढा दिला आणि सुखरूप बाहेरही पडले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE