2 May 2025 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिवसेनेचा २०१४मध्येही काँग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव होता: पृथ्वीराज चव्हाण

CM Prithviraj Chavan, Shivsena, Cogress

मुंबई: “२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता,” असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.

शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारा परस्पर विरुद्ध असतानाही या दोन पक्षांची मैत्री कशी होऊ शकली, या प्रश्नावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर बोट ठेवले. पाच वर्षांपूर्वीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं अल्पमतातलं सरकार विराजमान झालं होतं. शिवसेना तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषे दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष-सेनेतील वाद पाहता या परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. मी यात पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा सुरु झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी सांगितले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत जबाबदार आणि मोजून मापून बोलणारी व्यक्ती आहेत. आपण काय बोलतो आहोत याचं त्यांना नीट भान असतं. उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार त्यांच्या बाबतीत होत नाही. ते जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे, असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले आहेत.

 

Web Title:  Shivsena party wanted to form government in alliance with congress after 2014 after Maharashtra polls says former CM Prithviraj Chavan.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या