मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री १०० दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत. फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्ही सुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

“आता हा मुद्दा पुन्हा बाहेर का काढला जात आहे? तुम्ही लोकांना धोका दिला. मोदींच्या नावे मतं मिळवली. अमित शाहांच्या भीतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला रिकामं केलं आणि त्यांनाच तिकीट देऊन तुम्ही सरकार चालवत आहात. आम्ही त्याचं खंडण करतो. अयोध्या दौरा करुन तुम्ही मुस्लिम, दलित, अल्पसंख्याक, भारतीय आणि धर्मनिरपेक्ष हिंदूंना धमकावत आहात. शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. आम्हाला विश्वास नाही की हे सरकार ६-८ महिन्यांपेक्षा जास्त चालेल”, असं फरहान आझमी म्हणाले.

फरहान आझमी म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्याला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात २.५ अरब लोकसंख्या आहे. त्यामध्ये ५० पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशाला आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही’असं ते म्हणाले.

 

Web Title:  Shivsena will make ram temple in Ayodhya and we will make Babri Masjid said Farhan Azmi a son of SP MLA Abu Azmi.

VIDEO – फरहान आझमी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार; चितावणीखोर धार्मिक भाषण