12 December 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

सरकारने 'महामित्र' अॅप प्ले-स्टोअरवरून हटवलं, आमचे प्रश्न : सविस्तर

मुंबई : राज्य सरकारच्या महामित्र अॅपमधील सर्व डेटा ‘अनुलोम’ या खासगी संस्थेला देण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तसेच त्यांनी हा मुद्दा विधानसभेत सुद्धा उचलून धरला होता त्यामुळे एकाच खळबळ उडाली होती.

खासगी कंपनी डेटा चोरी करत असल्याचा आरोप करत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा विधानसभेत सुद्धा उचलून धरला होता त्यामुळे एकाच खळबळ उडाली होती. त्यातून ‘महामित्र’ हे अॅप राज्य सरकारने गुगल प्ले-स्टोअर वरून हटवल्याने आपण केलेला आरोप आणि संशय बळावत आहे असं त्यांनी ट्विट वरून प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी ‘महामित्र’ अॅप बद्दल उपस्थित केलेले प्रश्न,

१. ‘महामित्र’ अॅप अचानक गुगल प्ले-स्टोअर वरून का काढण्यात आले ?
२. ‘महामित्र’ अॅप गुगलच्या अधिकारात होते की ‘DGIPR’ च्या अधिकारात ?
३. ‘महामित्र’ अॅपचे डेव्हलपवर कोण आहेत ?
४. राज्य शासनाने निवडलेल्या ३०० महामित्रांना निवडीमागचे नक्की निकष काय होते ? तसेच त्यांची नावे, पत्ते आणि मानधन राज्य सरकार जाहीर करेल काय ?
५. राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत स्पष्टं केलं होत की, DGIPR आणि अनुलोम मध्ये करार झाला होता. मग त्या कराराचं नक्की स्वरूप काय होत ? तसेच अनुलोमला त्यासाठी मोबदला मिळाला का ? तसेच अनुलोमची कुठल्या निकषावर निवड करण्यात आली ?

फडणवीस सरकारचे स्पष्टीकरण

सामाजिक माध्यमांवर महामित्र हा उपक्रम ठराविक कालावधीपुरताच असल्याच स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. आता उपक्रम संपल्यामुळे ते अॅप सुरु ठेवण्याची आवश्यकता नसल्याने ते अॅप गुगल प्ले-स्टोअर वरून काढून टाकले आहे, अशी माहिती सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

आमच्या दृष्टीकोनातून अनुत्तरित राहिलेले प्रश्न,

१. ‘महामित्र’ हा उपक्रम जरी ठराविक कालावधीसाठीच होत असे मान्य केले, तसेच त्यातून राज्यभरातून ३०० महामित्रांची जरी निवड झाली असेल तरी नोंदणी केलेल्या ८५,००० अर्जदारांच्या जमा केलेल्या डेटाचे काय झाले ?
२. या सर्व मोबदल्यात अनुलोमला काय मिळालं ?
३. ८५,००० अर्जदारांचा व्यक्तिगत डेटा नियोजित कार्यकाळ संपल्यानंतर ‘सव्हरवरून नष्ट’ करण्यात आला की ‘सर्व्हर वर’ अजूनही जमा आहे ?
४. ‘महामित्र अॅप’ गुगल प्ले-स्टोअर वरून तर काढले, परंतु ८५,००० अर्जदारांचा महत्वाचा डेटा ‘सर्व्हर वर’ आहे की नाही ? कारण अॅप गुगल प्ले-स्टोअर वरून काढून टाकणे आणि डेटा ‘सर्व्हर वरून’ काढणे हे दोन्ही विषय तांत्रिक दृष्ट्या भिन्न आहेत जे सामान्य लोकांच्या कधीच ध्यानात येत नाही.
५. ‘महामित्र अॅप’चे सर्व्हर संबंधित ‘ऍडमिन अधिकार’ अनुलोम कडे होते की DGIPR कडे, कारण डेटा हा सर्व्हरवर जमा असतो, प्ले-स्टोअरवर नाही ?

हॅशटॅग्स

#Maha Mitra App(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x