19 April 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राज्यात कलम १४४ लागू; ५ पेक्षा जास्त जण एकत्र आल्यास ताब्यात घेणार: मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

मुंबई, २२ मार्च: करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, ५ पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, नाईलाजाने आज मध्यरात्रीपासून आम्ही राज्यात कलम १४४ लागू लागू करीत आहोत. आज मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाहीत. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.

तसेच शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी आहे. करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढतो त्यामुळे अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summery:  Meanwhile, Uddhav Thackeray has made an important decision to prevent the outbreak of Corona. Section 3 has been implemented in the state and if more than 5 people come together they will be detained, ” Uddhav Thackeray said. He further said that it is time for the outbreak of the disease. The sensitive and important phase has taken place. The number of outbreaks has been increasing for the last two days. This number needs to be stopped as soon as possible. The Chief Minister said, “We have been implementing section 144 in the state since midnight today. No one will come from abroad to midnight from midnight. Private buses, STs, locals will be completely closed. The Chief Minister appealed that those coming from abroad should be left alone. He urged all those who have come abroad in the last 15 days to move out of the house without any need, if you have come in contact with them, you should not go out.

 

News English Title:  Story Chief Minister Uddhav Thackeray address the state lock down Corona virus crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x