15 December 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

गरजूंना मदत नक्की करा पण या गोष्टी टाळा...राज ठाकरेंचं आवाहन

MNS Chief Raj Thackeray, Covid19, Corona Crisis

मुंबई, १४ एप्रिल: ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं आहे.

कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्र सैनिक गरजूंच्या मदतीला धावून जात आहे. त्यांची छायाचित्रंही एमएनएस अधिकृतच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या त्या भागातील लोकांना गरज असल्यास कोणाशी संपर्क साधायचा, या हेतूनं हे करण्यात येणार असल्याचं राज यांनी ट्विट करून सांगितलं. काही मोजके जण कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणं, ज्याला मदत दिली जातेय त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणं किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणं या चुकीच्या गोष्टी करत असल्याचं राज यांनी ट्विटर प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

या मदतकार्याची छायाचित्रं [email protected] वर येत आहेत. जे मी व्यक्तिशः पाहत आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कामांना एमएनएस अधिकृतवर प्रसारित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्याचा उद्देश इतकाच की त्या त्या भागातील लोकांना काही गरज असल्यास कोणाशी संपर्क साधावा हे कळावं.

या कठीण प्रसंगात फक्त महाराष्ट्र सैनिकच नाहीत, तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील मनापासून मेहनत घेत आहेत. मदतीला धावून जात आहेत. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. माझं त्यांना पण आवाहन आहे की, तुम्ही देखील ह्याचा विचार करावा. महाराष्ट्राची निरपेक्ष सेवेची परंपरा मोठी आहे, त्या परंपरेचं पुन्हा एकदा दर्शन आपण सगळ्यांनी जगाला दाखवूया.

 

News English Summary: Maharashtra troops are rushing to help those in need during the Corona crisis. An attempt is also being made to publish their photographs through an MNS official. Raj told that the people in those areas would be contacted if needed. Raj said in a letter published on Twitter that some people were doing the wrong thing by taking a look at the camera and asking the person who was assisted to look at the camera or taking a photo of goggle doing the assist.

News English Title: Story Maharashtra lockdown MNS Chief Raj Thackeray appeals party workers to avoid photos while helping needy people Covid19 Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x