आधी सावरकरांना भारतरत्न द्या; महाविकास आघाडीकडून भाजपची विकेट

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखली होती. मात्र ती रणनीती भाजपवरच पलटली आहे.
सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभेनं सावरकर गौरव प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी भाजपनं अध्यक्षांकडं केली होती. कामकाज सुरू होताच सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची भाजपची भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुमोदन देताना काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकातून सावरकरांबद्दल लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा उल्लेख केला. तसंच, शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काँग्रेसच्या मासिकात वापरण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शिदोरी मासिकावरही बंदी घालावी आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा अशी मागणी करण्यात आली. या प्रस्तावावरुन भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
तर शिवसेनेने भाजपाचा डाव त्यांच्यावर उलटवून लावला. भाजपाने ज्या प्रस्तावाची मागणी केली आहे. त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, यावर नितेश राणे यांचे मत घ्या, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा असा टोला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी लगावला.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य सरकारने यापूर्वी केंद्र सरकारला पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप केंद्राने ही मागणी पूर्ण केली नाही. केंद्रात भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे यासाठी प्रयत्न करावेत, आम्हीही प्रयत्न करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
News English Summery: Savarkar’s glorious proposal presented by the Bharatiya Janata Party in the state assembly today was rejected by Assembly Speaker Nana Patole. On the death anniversary of Savarkar, the state government demanded that the two lines of glory be resolved. But first, give Savarkar ‘Bharat Ratna’. We also propose to congratulate Prime Minister Narendra Modi with you, the ruling party responded. The protesters thronged the House.
Web Title: Story Maharashtra State budget session assembly speaker Nana Patole rejected oppositions Veer Savarkar Gaurav proposal.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC