12 May 2025 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

CAA-NRC विरोध मोर्चा: आझाद मैदानात संविधान बचाओ, भारत बचाओ घोषणाबाजी

CAA, NRC, NPR, Massive Protest, Mumbai Azad Maidan

मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण ६५ संघटना या महामोर्चात सहभागी झाल्या आहेत. ‘संविधान बचाव’चा नारा या मोर्चातून घुमत आहे.

फक्त मुसलमानच नाही तर इतर धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. CAA, NRC आणि NPR ला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलनत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

दोन ठग लोकांना छळत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. अबू आझमी देखील सीएए आणि एनआरसी’च्या विराधातील मोर्च्यात सहभागी झाले आहे.

 

Web Title: Story massive Protest at Mumbai City Azad Maidan against CAA NRC NPR.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या