18 January 2025 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली

Nepal industrial minister Lekhraj Bhatta, MNS Chief Raj Thackeray

मुंबई: नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी आज कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, या भेटीत इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या राज ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य किंवा केंद्रात कोणतंही स्थान किंवा सहभाग नसताना लेखराज भट्टा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.

स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. आज राज ठाकरे नवी मुंबईतील मनसेने आयोजित केलेल्या ‘पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०’ला देखील हजेरी लावणार आहेत आणि त्या अनुषंगाने नवी मुंबईत देखील त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

औरंगाबाद दौऱ्यानंतर राज ठाकरेंचा पुढील पक्ष विस्ताराचा दौरा कधी होणार ते निश्चित नसलं तरी मनसेने आगामी औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी स्थानिक पातळीवर सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Web Title: Story Nepal industrial minister Lekhraj Bhatta meet MNS Chief Raj Thackeray Mumbai.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x