फडणवीस महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेऊन बोलतात
मुंबई, ४ मे: आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या (IFSC) वादात महाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून देवेंद्र फडणवीस गुजरातचीच वकिली करत असल्याची जळजळीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने १ मे रोजी मुंबईतील प्रस्तावित IFSC केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यूपीए सरकारने २००७ ते २०१४ या काळात मुंबईतील IFSC केंद्रासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे हे केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले, असे सांगत फडणवीस यांनी मोदी सरकारची बाजू उचलून धरली होती.
केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार आहे आणि त्यातून मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गांधीनगर येथे गेले अशी भावना लोकांमध्ये आहे. हे वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गांधीनगरला कसे गेले यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते निरर्थक आहेत. देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आता एकमेकांवर जे आरोप करीत आहेत त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार?, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आग ओकण्यात आली आहे. मुंबईतील वित्तीय केंद्र गांधीनगरला कसे गेले, यावरुन सुरु असणारे आरोप-प्रत्यारोप निरर्थक आहेत. अवघ्या १०० दिवसांपूर्वी सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे योग्य ठरणार नाही. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला होता. आता हे काम फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. मात्र, फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेऊन बोलत असतील तर हा विरोधी पक्ष कुचकामी आहे.
शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत केंद्र सरकारने पक्षपात केला हे तुम्हाला मान्य आहे काय?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईतल्या अनेक वित्तीय संस्था, उद्योग-व्यापार गुजरातला हलवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलेच आहे. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला. आता हे काम श्री. फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू धरून बोलत असतील तर हा असला विरोधी पक्ष कुचकामी आहे व महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना जनताच मुंबईच्या अरबी समुद्रात बुडवेल.
News English Summary: Shiv Sena has slammed Devendra Fadnavis for advocating for Gujarat instead of taking Maharashtra’s side in the International Financial Center (IFSC) controversy. The central government had on May 1 decided to shift the proposed IFSC center in Mumbai to Gujarat. Therefore, the political atmosphere in Maharashtra is very hot. From 2007 to 2014, the UPA government did nothing for the IFSC center in Mumbai. Therefore, this center was shifted to Gujarat, said Fadnavis, who had sided with the Modi government.
News English Title: Story Shivsena slams opposition leader Devendra Fadnavis and BJP after IFSC moved to gujarat from Mumbai News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा