15 December 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Sunrise Over Ayodhya | सलमान खुर्शीद यांच्या विरोधात बजरंग दल पोलिसात तक्रार करून न्यायालयीन लढा देणार

Sunrise Over Ayodhya

मुंबई, 24 नोव्हेंबर | आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनेशी केल्याने सलमान खुर्शीद वादात सापडले होते आणि त्यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता आणि तीव्र प्रतिकिया उमटल्या होत्या. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनितालमधील घरावर हल्ला करुन तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात (Sunrise Over Ayodhya) आली होती.

Sunrise Over Ayodhya. Mumbai’s Bajrang Dal district coordinator Gautam Ravariya have decided to lodged a complaint against Congress leader Salman Khurshid directly with the Mumbai Police Commissioner after controversial book :

सलमान खुर्शीद यांनी आपलं पुस्तक ‘Sunrise Over Ayodhya’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जात होतं. या हल्ल्यानंतर सलमान खुर्शीद यांनी प्रतिक्रिया देताना हा हिंदुत्ववाद नसल्याचं म्हटलं होते. त्यादरम्यान त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्ला मुलाखतीत हल्ल्यावरुन नाराजी जाहीर केली होती आणि हिंदुत्व काय करायचं पहायचं असेल तर, माझ्या घराचा जळालेला पाहा असं सांगितलं होते.

त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम येथे आयोजित कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले होते. मी हिंदुत्व आणि आयसीस एकच आहेत असं म्हटलं नसून दोन्ही एकसारखे असल्याचं म्हटलंय, असं सलमान खुर्शीद त्यावेळी म्हणाले होते. मात्र अजूनही सलमान खुर्शीद यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

यासंदर्भात भाजपने देखील तीव्र प्रतिकीर्या दिली होती. हिंदूंचा अपमान भारत सहन करणार नाही! काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि रशीद अल्वी यांच्या विरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या, या कारणास्तव घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांनी केली होती आणि एफआयआर नोंदवला नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

त्यानंतर विश्व हिंदू परिषदेची संलग्न असलेली संघटना बजरंग दल देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील बजरंग दल सहार जिल्हा संयोजक गौतम रावरीया हे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या विवादित पुस्तकानंतर त्यांच्या विरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे आणि अंधेरी पूर्व येथील MIDC पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे बजरंग दल मुंबई (सहार) जिल्हा संयोजक गौतम रावरीया हे सलमान खुर्शीद यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देखील देणार आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sunrise Over Ayodhya Mumbai Bajrang Dal leader Gautam Ravariya will lodge a complaint against Salman Khurshid.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x