कोरोनाची तिसरी लाट आपल्या दारावर येऊन पोहोचली आहे | खबरदारी घेणं गरजेचं - महापौर

मुंबई, ०८ सप्टेंबर | कोरोनाची तिसरी लाट दारावर येऊन पोहोचली आहे, असं म्हटलंय. “मी मुंबईत करोनाची तिसरी लाट आली आहे, असं म्हटलं नव्हतं. मंत्री नितीन राऊत म्हणाले होते, की नागपुरात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आपल्या दारावर आली असून खबरदारी घेणं गरजेचं आहे,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
कोरोनाची तिसरी लाट आपल्या दारावर येऊन पोहोचली आहे, खबरदारी घेणं गरजेचं – महापौर – Third Wave is nearby Mumbai said Mumbai Mayor Kishori Pednekar :
किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या होत्या की, करोनाची तिसरी लाट येणार नसून ती आधीच आली आहे. नागपुरात तर तिसरी लाट आल्याचं मंत्री राऊतांनी म्हटलंय. यानंतर त्यांच्या कार्यालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढून पेडणेकर यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. तिसरी लाट मुंबईच्या वेशीवर असून पहिल्या दोन लाटांचा अनुभव पाहता, ते थांबवणे आपल्या हातात आहे,” असं महापौर पेडणेकर म्हणाल्याचं म्हटलंय.
मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले, “करोना अजून संपलेला नाही, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्याकडे अद्याप १२ ते १८ या वयोगटासाठी करोनाची लस उपलब्ध नाही. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा लहान मुलांना फटका बसलाय. मुंबई आणि महाराष्ट्रात तिसरी लाट टाळण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आपण सर्वांनी करोना नियमांचे पालन केल्यास तिसरी लाट थांबवता येऊ शकते.”
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Third Wave is nearby Mumbai said Mumbai Mayor Kishori Pednekar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE