नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदाचा म्होरक्या मसूद अजहर हाच सुंजवाँ कॅम्पवरील हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे, भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सुंजवाँ कॅम्पची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सुंजवाँ कॅम्पवरील स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया दिली. घटनास्थळावरून लष्कराने महत्वाची कागदपत्रे आणि सामान जप्त केले असून ते सर्व पुरावे लवकरच सादर केले जातील. तसेच हाती लागलेले पुरावे हेच सिध्द करणारे आहे की या हल्ल्या मागे पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मदचा हाथ असल्याचे स्पष्ट होत आहे.

शनिवारी सकाळी जैश-ए-मोहम्मदचे ३ अतिरेकी कॅम्प मध्ये घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्याने काहीवेळातच दहशतीचे वातावरण झाले. ३० तासाहून अधिक वेळ चाललेल्या या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले तर भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले. एक जवानाच्या वडिलांचाही या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवानं मृत्यू झाला. दरम्यान पत्रकार परिषद आयोजित करण्यापूर्वी निर्मला सीतारमन यांनी जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेऊन निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली.

Defence Minister will hold a press conference after visiting Sunjwan Camp