27 July 2021 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

#VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे हे सिद्ध होतं

Shivsena, Uddhav Thackeray, Amit Shah

मुंबई: सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र अमित शहा यांनी मातोश्रीवर भेट दिल्यानंतर जी चर्चा झाली होती, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधत यावर भाष्य करत शिवसैनिकांना खात्री दिली होती. त्याचा पुरावा म्हणजे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मोठा पुरावा म्हणावा लागेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काय आहे तो नेमका व्हिडिओ?

तत्पूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं असा दावा करणारे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेनं आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रत्येक सभेत सांगत असताना अमित शहा गप्प का होते. त्यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही,’ असा सवाल करतानाच, ‘अमित शहा यांनी युतीच्या सत्तावाटपाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून लपवली,’ असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केला.

राऊत यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बंद दाराआड जी चर्चा झाली ती पंतप्रधानांपर्यंत नेली असती तर इतकी वेळ आली नसती. ही बंद खोली सामान्य खोली नव्हती. ज्या खोलीत बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आशिर्वाद दिला. पंतप्रधान मोदींनी इथे आशिर्वाद घेतला. इथे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आमच्यासाठी हे मंदीर आहे. या मंदीरात ही चर्चा झाली. संपूर्ण देशाची श्रद्धा या मंदीराशी जोडली गेली आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही कधी खोट बोलणार नाही. आम्ही खोट्याचे राजकारण करणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x