14 December 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

भाजप नेते आरएसएस'च्या भेटीगाठी घेत असताना पवार शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नागपुरात

NCP President Sharad Pawar, Farmers

नागपूर: कालच भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. एकाबाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रडू कोसळत असताना नुकतेच पायउतार झालेले भाजप नेते अजून सत्तेच्या स्वप्नात मग्न असल्याचं उघड झालं होतं. मात्र आज स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या आहेत.

तत्पूर्वी राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले होते. शरद पवार गेल्या शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले होते. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

पवार यांनी दवंगे या शेतकऱ्यांकडून किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली होती. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ नका असा सल्ला दिला होता. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ सगळ्याच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकरयांचे झाले आहे. द्राक्ष बागांसोबत हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले. सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे.

पवार दौऱ्यावर जाताच, राज्यातील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ३ नोव्हेंबरच्या बैठकीत घेतला होता. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते. सुमारे ३२५ तालुक्यांमध्ये ५४,२२,००० हेक्टरवर पीकं बाधित झाली आहेत. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते.

त्यानंतर ६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीद्वारे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. मुंबईत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होतो. मुनगंटीवार म्हणाले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीचा शेतकरी हा केंद्रबिंदू होता. या बैठकीत अवकाळी पावसामळे जे नुकसान झालंय त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसानीचा अंदाज घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांतील ७० लाख हेक्टरवर अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी १९ लाख हेक्टवर कापूस, १८ लक्ष हेक्टरवर सोयाबीन व इतर नुकसानीचा अंदाज समोर आहे. आत्तापर्यंत ६० लाख हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा झाली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीने मदत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.

कोकणापासून पूर्व विदर्भापर्यंत शेतकरी व शेतमजुरांना २ ते ३ रुपये किलो दराने धान्य पुरवठा करण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जी उभी पीकं जमीनदोस्त झाली अशा शेतीच्या सफाईसाठी मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून बँकांनी सक्तीची कर्जवसूली करु नये असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चारा निर्मितीच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने रब्बीचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावरही लक्ष ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या होते, मात्र आठवडाभर परिस्थिती जैसे थे ठेऊन भाजप नेते सत्तास्थापनेच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करून राहिल्याचे पाहायला मिळाले आणि राष्ट्रपती राजवट लागू होताच शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचं पत्रकार परिषदेत भासवु लागल्याचं नजरेस पडलं.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x