12 December 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

भाजपाला सोडून महाविकास आघाडीत गेले तेव्हाच शिवसेनेचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार कळले

Shivsena, Mahavikas Aghadi, Hindutva, BJP leader Pravind Darekar

वसई, ८ डिसेंबर: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणलेला कायदाच शेतकऱ्यांसाठीचा आत्मा आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. ते केवळ राजकीय स्वार्थासाठी हे करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीतला फरक कळतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर (Vidhan Parishad Leader Pravin Darekar) यांनी सांगितले.

सध्याच्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा विसर पडला आहे. संपूर्ण पक्ष हा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यापुढे लीन झाल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. शिवसेना स्वत:चा इतिहास विसरत चालली आहे. त्यामुळे आता ते मागचे काहीच काढत नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली.

भारतीय जनता पक्षाला सोडून शिवसेना जेव्हा महाविकास आघाडीसोबत गेली तेव्हा त्यांचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार (When Shiv Sena left the Bharatiya Janata Party and joined the Mahavikas Aghadi, we understood Shivsena’s thought about Hindutva) कळले. महाविकास आघाडी सरकारने स्वत:च्या काळजात काय चाललंय यापेक्षा शेतकरी आणि जनतेच्या मनातील गोष्टी जाणून घ्याव्यात. काही दिवसांपूर्वी कृषी कायदे आणण्यासाठी याच राजकीय पक्षांनी खुलेआम पत्रक काढले होते, समर्थन दिले होते. त्यामुळे आजचा बंद हा शेतकऱ्यांचा आडून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली.

 

News English Summary: When Shiv Sena left the Bharatiya Janata Party and joined the Mahavikas Aghadi, we came to know about Shivsena’s thoughts about Hindutva. The Mahavikas Aghadi government should know what is going on in the minds of the farmers and the people rather than what is going on in its own worries. A few days ago, these same political parties had issued open leaflets to support the enactment of agricultural laws. Therefore, BJP leader Pravin Darekar criticized today’s bandh as an attempt to gain political interest from the farmers.

News English Title: When Shivsena joined Mahavikas Aghadi we understood Shivsena thought about Hindutva said BJP leader Pravind Darekar News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x