9 May 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON
x

Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा

Nippon India Mutual Fund

Nippon India Mutual Fund | सध्याच्या घडीला शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये प्रचंड जोखीम वाढली आहे. त्याचबरोबर 2024 ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. परंतु बाजारातील धोका कमी करून म्युच्युअल फंड योजना आपल्या ग्राहकांना मजबूत परतावा मिळवून देत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात कमी आणि म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिकच वाढले आहे.

मागील 10 वर्षांपासून सातत्याने मजबूत परतावा मिळवत म्युच्युअल फंडाच्या, टॉप 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंडांनी आपल्या ग्राहकांना मालामाल करून सोडलं आहे. आज आपण या बातमीपत्रातून संपूर्ण यादी पाहणार आहोत.

कोणते म्युच्युअल फंड सुरक्षित असतात :
म्युच्युअल फंडमध्ये देखील प्रकार आहेत लार्ज कॅप म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आणि मीडकॅप म्युझिकल फंड. यांपैकी स्मॉल कॅप आणि मिडकॅप हे म्युच्युअल फंड जास्त प्रमाणात स्थिर नसतात. परंतु लार्ज कॅप फंड तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. या फंडांमध्ये वर्षभरात जास्त प्रमाणात चढ-उताराचा प्रश्न सतावत नाही आणि गुंतवणूकदाराला देखील आपले पैसे बुडण्याचे टेन्शन राहत नाही.

एचडीएफसी लार्ज कॅप फंड :
एचडीएफसी लार्ज कॅप फंड गुंतवणूकदारांच्या चांगला पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी या फंडाद्वारे स्वतःची पोटली भरून घेतली आहे. एचडीएफसीच्या लार्ज कॅप फंडाने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 11.10% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे AUM 4,847.82 कोटी रुपये आहे.

कोटक ब्लूचिप फंड :
कोटक ब्लूचिप फंडाने आपल्या गुंतवणूकदारा मालामाल केलं आहे. मागील 10 वर्षांमध्ये गुंतवणूकदारा 11.24% एवढा घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. सध्याच्या घडीला या फंडाकडे एकूण 9,025.47 कोटी रुपयांचा निधी तयार आहे.

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड :
निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड अत्यंत जुना फंड असून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. मागील दहा वर्षांमध्ये या फंडाने गुंतवणूकदारा 12.46% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे सध्याचे मूल्य 34517.63 कोटी रुपये आहे.

एसबीआय ब्लूचिप फंड :
एसबीआयचा ब्ल्यूचीफ फंड देखील कमालीचा ठरलेला आहे. बाजारात घसरण असून सुद्धा या फंडाने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. मागील दहा वर्षांत 11.62% परतावा मिळवला आहे. AUM मध्ये या फंडाचे मूल्य 48062.06 कोटी रुपये आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप फंड :
आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप फंडाने आपल्या ग्राहकांना मागील 10 वर्षांमध्ये 12.53% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे सध्याचे बाजार मूल्य 61714.99 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Nippon India Mutual Fund Friday 31January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या