
SIP Calculator| आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला भरपूर पैशांची गरज असते. पैशाशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. काही वेळा आपली बचत किंवा गुंतवणूक यांचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक सुरू करा. त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला पद्धतशीर गुंतवणूक करावी लागेल, यालाच SIP असे म्हणतात. SIP मध्ये, तुम्ही दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवणूक करून सहज मोठा परतावा कमवू शकता. तुम्ही दर महिन्याला फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू केल्यास दीर्घकाळात तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ SIP चा पूर्ण हिशोब
SIP वर मिळणारा परतावा :
जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्ये दरमहा फक्त 500 रुपये 11 वर्षांसाठी जमा केले तर तुम्हाला 5 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल. तुमची 11 वर्षात म्हणजे 132 महिन्यांची एकूण गुंतवणूक 66,000 रुपये होईल आणि तुम्हाला 11 वर्षांच्या कालावधीत सरासरी वार्षिक 30 टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 4,47,206 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच 11 वर्षांनंतर तुमच्या 66000 रुपये गुंतवणुकीचे 5,13,208 रुपये झाले असतील.
एसआयपी म्हणजे काय? :
वास्तविक SIP म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो. मध्ये म्युचुअल फंड योजनेत SIP च्या माध्यमांतून साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक आधारावर पैसे जमा करू शकता. म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या मते, तुम्ही SIP मध्ये जितका अधिक काळ गुंतवणूक कराल, तितका जास्त परतावा तुम्ही कळवू शकता. अशा अनेक SIP योजना आहेत ज्यातून लोकांनी 25 ते 30 टक्के सरासरी वार्षिक नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.