
Tax Saving Mutual Funds | म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिल्याने देशात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्युच्युअल फंडांचा एक वर्ग वगळता त्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला करसवलत मिळत नाही. ती श्रेणी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएस (Equity Linked Saving Scheme) म्हणून ओळखली जाते.
म्युच्युअल फंड योजनांमध्ये ईएलएसएस हा चांगला पर्याय मानला जातो. ईएलएसएस गुंतवणुकीची रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली जाते. ईएलएसएसमध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते.
गेल्या 3 वर्षात अनेक ईएलएसएस फंडांनी ही प्रभावी परतावा दिला आहे. याच कारणास्तव ईएलएसएसला टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड स्कीम असेही म्हणतात. ईएलएसएस मध्ये तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करसवलत दिली जाते.
लॉक-इन कालावधी फक्त 3 वर्षांचा
ईएलएसएसमध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करू शकता आणि एसआयपीच्या माध्यमातूनही गुंतवणूक करू शकता. ईएलएसएसची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एनएससी आणि टॅक्स सेव्हिंग एफडीसारख्या योजनांमध्ये 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीप्रमाणे, यात 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममधील ३ वर्षांचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार ते चालू ठेवू शकतो.
ईएलएसएस : 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता
ईएलएसएस म्युच्युअल फंडात तुम्हाला तुमच्या बजेट आणि सोयीनुसार योजना निवडण्याचा पर्याय मिळतो. यात तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. तज्ज्ञांच्या मते, ईएलएसएसमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.
टॉप 5 ईएलएसएस म्युच्युअल फंड (3 वर्षात परतावा)
* क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – 32.35%
* एचडीएफसी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – 25.02%
* बंधन ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – 24.94%
* एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड – 24.71%
* बँक ऑफ इंडिया ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – 23.88%
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.