20 June 2021 10:18 PM
अँप डाउनलोड

जुन्या भाजप नेत्यांना डावलून मर्जीतल्या प्रवीण दरेकरांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद

MLA Pravin Darekar, Devendra Fadnavis

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, दरेकर यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. परंतु, त्यांना मागे सारत दरेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत बाजी मारली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एनसीपी’चे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे. आपल्या जोरदार भाषणांनी धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद हलवून सोडली होती. आता तशीच अपेक्षा प्रविण दरेकर यांच्याकडून असेल.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रविण दरेकर हे मुंबईच्या मागाठणे मतदारसंघातून विधानपरिषद आमदार आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे, पहिल्यांदाच विधानपरिषद आमदार बनलेल्या प्रविण दरेकर यांना भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेत मोठी जबाबदारी दिली आहे. दरम्यान, प्रविण दरेकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही विविध माध्यमांमध्ये भारतीय जनता पक्षाची बाजू मांडताना दिसतात. प्रविण दरेकर यांच्याकडे सहकारी क्षेत्रातील कामाचा दाणगा अनुभव आहे.

 

Web Title:  BJP MLA Pravin Darekar Appointed as a New Opposition leader of Maharashtra Vidhan Parishad declared by Devendra Fadnavis

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(613)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x