1 May 2025 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

विधिमंडळातील घोषणाबाजी पेक्षा मोदींकडे राज्याच्या हक्काचे १४,६०० कोटी मागा: जयंत पाटील

Minister Jayant Patil, Opposition Leader Devendra Fadnavis, Chief Minister Uddhav Thackeray

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर, यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारले.

तत्पूर्वी, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, राज्य सरकारने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६६०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यातले २१०० कोटी रुपये जिल्ह्यांपर्यंत पोहचले आहेत. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर केंद्राकडून राज्य सरकारचे पैसे मागावेत. राज्य सरकारचे १४,६०० कोटी केंद्राने अडवले आहेत. फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषणाबाजी करण्यापेक्षा मोदींकडे पैसे देण्याची विनंती करावी, असेही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title:  Demand Rupee 14600 Crore from PM Narendra Modi says Minister Jayant Patil to Devendra Fadanvis ove Farmer issue.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या