18 May 2021 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

नाशिकमध्ये भरधाव वाहनाने सात लहान मुलांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू

नाशिक : वडाळागावात राहणारी ७ लहान मुलं आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. दरम्यान, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. सकाळी ३ वाजता घटना घडली तेव्हा बऱ्यापैकी शुकशुकाट होता. त्यामुळे जखमींना उपचार मिळण्यास सुद्धा बराच उशीर झाला होता. सध्या जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळी झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या त्या वाहनचालकाचा सध्या स्थानिक पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, जागीच मृत्यू झालेल्या मुलाचे नाव विशाल पवार असून त्याचे वय ११ वर्ष असल्याचे समजते.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x