1 May 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात मतदारांप्रमाणे इतर पक्षातून दत्तक घेतलेले नेते सुद्धा कंटाळले | सेनेच्या संपर्कात

BJP Maharashtra

नाशिक, २८ ऑगस्ट | नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत.

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात मतदारांप्रमाणे इतर पक्षातून दत्तक घेतलेले नेते सुद्धा कंटाळले, सेनेच्या संपर्कात – Nashik Former deputy mayor Prathamesh Gite meet Shivsena MP Sanjay Raut :

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्के देण्याची पूर्ण योजना आखली आहे. त्यामुळे नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते असलेले सुनील बागुल आणि वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर आता माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपात गळचेपी होत असून बोलू दिलं जात नसल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे भाजपला नाशिकमध्ये पहिला धक्का देणार आहेत. प्रथमेश गिते हे शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबतची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र ते भाजपमध्ये नाराज आहेत हे मात्र निश्चित आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nashik Former deputy mayor Prathamesh Gite meet Shivsena MP Sanjay Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या