Marathi Manus | मराठी भाषा मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाचा प्रचंड पाठिंबा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी भाषेबद्दल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाचा अद्वितीय प्रतिसाद मिळत आहे. दोन दशकानंतर एकत्र आलेले हे ठाकरे बंधू मराठी अस्मिता संरक्षणासाठी जोरदार आवाज उठवत आहेत, ज्याला मराठी समाजाकडून मोठं समर्थन मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र सैनिकांची ताकद एकत्र आल्याने कारकर्त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय.
मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या संरक्षणासाठी एकजुटता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे (उद्धव बालासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी जूनमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदीला तिसऱ्या भाषेच्या रूपात लागू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याचा या दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध केला होता. ठाकरे बंधूंच्या आणि मराठी जनतेच्या दबावामुळे राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. या मराठी विजयानिमित्त ५ जुलै रोजी मुंबईमध्ये झालेल्या ‘आवाज मराठीचा’ सभेत दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसाला एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. ज्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’
वरळी डोममधील त्या सभेला मराठी माणसाने जबरदस्त पाठिंबा दिला. मुंबईच्या विविध भागातून लाखो मराठी लोक या सभेत सहभागी झाले होते. मराठी जनतेला राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होतं. तर उद्धव ठाकरे यांनी म्हटले, “मराठी ही आपली मातृभाषा आहे, आणि मराठी भाषेचा अपमान आम्ही कोणत्याही किंमतीत सहन करणार नाही. तसेच ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असं म्हणत मराठी माणसामध्ये तसेच शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला होता.
मुंबईसह महाराष्ट्रभर मराठी माणसाचा उत्साह
मुंबई जरी महाराष्ट्राची राजधानी असली तरी मराठी लोंकांसाठीसहित इथे विविध भाषिक समुदायांचे अस्तित्व आहे आणि हे अमराठी समाजाचे लोक शिस्तबद्ध स्वतःच्याच समाजाचे मतदारसंघ निर्माण करून बसले आहेत. विषय हिंदी भाषेचा असला तरी, तरी हिंदीला पुढे करून यामागील खरे सूत्रधार हे गुजराती समाजाचे लोक आणि गुजराती राजकारणी असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
स्थानिक पक्ष, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी लोकांचं अस्तित्वच संपवण्याचा घाट
इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील शिवसेना, मनसे आणि इतर स्थानिक पक्ष आणि या स्थानिक पक्षांच्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या संपवून पुढे मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी लोकांचं अस्तित्वच मुंबई आणि आसपासच्या शहरांमधून नष्ट करून टाकण्याची योजना ही खरी गुजराती लोकं आणि गुजराती राजकारण्यांनी आखल्याची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे. त्यासाठी हिंदी भाषेचा आधार घेऊन ‘गुजराती भाषेला’ पडद्याआड ठेवलं जातंय, असं म्हटलं जातंय.
मराठी महिला आणि मराठी तरुण वर्ग ठाकरे बंधूंसोबत
अशा बिकट परिस्थितीत मराठी भाषेची ओळख जपण्यासाठी ठाकरे बंधूंच्या प्रयत्नांना मराठी समाजाने मनःपूर्वक आणि सर्व शक्तीनिशी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. सामान्य मराठी माणूस, विशेषतः मराठी महिला आणि मराठी तरुण वर्ग, या प्रश्नावर ठाकरे बंधूंसोबत ठामपणे उभा असल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर सुद्धा #मराठी_अस्मिता आणि #आवाज_मराठ्याचा हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, जो मराठी माणसाच्या उत्साहाचे प्रदर्शन करत आहे.
केवळ मराठी लोकं नव्हे, मराठी पत्रकार देखील आनंद व्यक्त करत आहेत
मुंबईसह आगामी अनेक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या रॅलीचा मोठा राजकीय परिणाम होणार हे स्पष्ट आहे. ठाकरे बंधूंनी मिळून मराठी माणसांमध्ये नवचैतन्य जागवल्याची भावना अनेक मराठी लोकं ऑन रेकॉर्ड बोलून दाखवत आहेत. मुंबई मराठी माणसाची आहे आणि नेहमीच राहील,” आणि त्यासाठी मराठी माणसाने स्वतःची जात-पात न पाहता केवळ मराठी म्हणून एकत्र यावं असं आवाहन ठाकरे बंधू आणि त्यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते करत आहेत. राज – उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचं स्पष्ट पाहायला मिळतंय, तसेच मराठी पत्रकार देखील या घटनेकडे पाहताना त्यांचं मराठीपण सुद्धा दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय.
मराठी भाषेचे संरक्षण करण्यासाठी भविष्यकाळातील योजनाएं
राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भविष्यातही एकत्र काम करण्याचे वचन दिले आहे. मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची योजना असल्याचं देखील समोर आलं आहे. तसेच, मुंबईमध्ये सर्व व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणण्याची रणनीती सुद्धा तयार करण्यात आली आहे.
या रॅलीनंतर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी मराठी भाषेच्या प्रचारासाठी मोर्चे आणि जनजागृती अभियान सुरु केले आहेत. यामुळे मराठी माणसामध्ये एक प्रकारची जागरूकता दिसून येत आहे. “मराठी बोलण्यात गर्व आहे,” असे म्हणत अनेक तरुणांनी या आंदोलनात भाग घेतला आहे.
मराठी माणसाचा विश्वास
ठाकरे बंधूंच्या या एकजुटतेमुळे मराठी माणसात विश्वास निर्माण झाला आहे. ‘आता मराठी माणूस आपली ओळख कायम टिकवून ठेवण्यासाठी एकजुटीने पुढे येईल,’ असे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुंबईच्या मराठी माणसाला आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी ठाकरे बंधूंवर खूप विश्वास व्यक्त केला आहे.
मराठी लोकांमध्ये नवी आशा जागृत केल्या
मराठी भाषा संदर्भातील या लढाईत राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी लोकांमध्ये नवी आशा जागृत केल्या आहेत. आगामी काळात ठाकरे बंधू कसे भक्कमपाने आपल्या विषयांवर टिकून राहतात आणि विषय पुढे घेऊन जातात ते पाहावं लागणार आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मराठी लोकं आपल्या मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी ठामपणे उभा राहिला आहे आणि त्यांच्याकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला प्रचंड पाठिंबा देण्यात येतोय.
