11 December 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
x

राज ठाकरेंनी मराठी भाषेचा मुद्दा सोडून व्यापक हिंदुत्व स्वीकारलं, फडणवीसांच्या वक्तव्याने मनसे उरलीसुरली मराठी मतंही गमावणार?

Devendra Fadnavis

Raj Thackeray | भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने मनसेच्या राजकीय अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकाबाजूला मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी अमराठी मतदार त्यांना मतदान करणार हे स्पष्ट आहे. दुसरकडे, आधीच अमराठी मतदार जेमतेम मतदान करत असताना फडणवीसांच्या वक्तव्याने त्यात भर घातल्याचं म्हटलं जातंय.

भाजप मनसेचा उरला सुराला मतदार देखील स्वतःकडे खेचण्यासाठी रणनीती आखात असल्याचं पाहायला मिळतंय आणि परिणामी सर्व भाजप नेते तशाच प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता केवळ मराठी भाषेचा मुद्दा सोडून व्यापक हिंदुत्व स्वीकारलं आहे. मात्र असं वक्तव्य करण्यामागे भाजपचा हेतू हा आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे वॉर्ड निहाय १०००-२००० मतदार स्वतःकडे खेचण्याचा असल्याचं म्हटलं जातंय.

इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना
शनिवारी रात्री इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे आमचे जुने मित्र आहेत. एकवेळ होता जेव्हा राज ठाकरे यांचे राजकारण खूपच संकुचित होते. ते केवळ ‘मराठी’ याच मुद्द्यावर भाष्य करायचे. महाराष्ट्रात मराठीबद्दल बोलल पाहिजेच. यात वादच नाही. पण मराठीसोबतच इतर भाषिकांचाही सन्मान व्हायला हवा. देशात भाषेच्या आधारावर कुठेही भेदभाव व्हायला नको, हे आमचं मत होतं.

भाजपपुरस्कृत भूमिका
यापूर्वी मराठी तरुणांचा एखादा रोजगार गेला तरी मनसे कंपनी मालकांवर हल्ले करण्याइतपत कठोर भूमिका घेत असत. मात्र आता लाखोंचा रोजगार राज्याबाहेर गेला तरी मनसे भाजपपुरस्कृत भूमिका घेताना दिसते हे देखील मराठी मतदारांना स्पष्ट दिसतंय. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना विरोधी भूमिका घेतल्याने मनसेला ऐतिहासिक राजकीय फटका बसेल असं राजकीय विश्लेषकांना देखील वाटतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis talked on political stand of MNS chief Raj Thackeray check details on 06 November 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x