लखनऊ : शिवसेना ‘एनडीए’त राहायचं की नाही तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
आम्ही २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहोत. परंतु स्वतः शिवनेचीच जर एनडीए मध्ये राहण्याची इच्छा नसेल तर ते त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचं मत अमित शहा यांनी मांडल.
शिवसेना हा आमचा जुना मित्र आहे आणि शिवसेना एनडीएपासून दूर जाऊ नये असं आम्हाला वाटतं. पण जर त्यांची तयारी नसेल तर त्यांनी निर्णय घ्यावा असं बोलून युतीबाबतचा निर्णय त्यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलवला. परंतु जर आगामी लोकसभा निवडणुकीत जर उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र आले तर भाजपसाठी मोठा आवाहन असेल असं त्यांनी मान्य केलं.
आगामी निवडणुकीत आंध्रप्रदेश, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल असं मत त्यांनी मांडलं. तसेच २०१४ मध्ये सुद्धा अनेक पक्ष भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढले होते तरी विजय भाजपचा झाला होते हे त्यांनी लक्ष्यात आणून दिल.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		