18 May 2021 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

अस्तिविसर्जन; भाजपच्या ४ चाकी'वाल्या नेत्यांचा वाजपेयींच्या कुटुंबियांना कटू अनुभव, रिक्षाने जाण्याची वेळ

ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे स्वर्गीय. अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं त्यावेळी वाजपेयींचे कुटुंबीय सुद्धा पोहोचले होते. परंतु त्यांना येथे वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागला. वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर उभं राहून बराचवेळ रिक्षाची वाट पाहावी लागली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना घरी परतण्यासाठी रिक्षा मिळाली. त्यानंतर वाजपेयींची भाची कांती मिश्रा यांनी खंत आणि कटू अनुभव सांगितला की, ‘जे चारचाकीवाले होते ते आपापल्या गाडीने पोहोचले. आम्ही रिक्षावाले असल्याने रिक्षाने आलो’. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं ग्लावियर येथे एक जुनं घर असून तिथे त्यांची भाची कांती मिश्रा, त्यांचे पती ओपी मिश्रा तसेच मुलगी कविता यांच्यासहित इतर नातेवाईक वास्तव्यास आहेत. याच कुटुंबाने आज भाजपच्या चारचाकी’वाल्या नेत्यांचा कटू अनुभव आला आहे.

वाजपेयींच्या अस्थी विसर्जन विधी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंहदेखील वाजपेयींच्या घरी पोहोचले होते. मात्र घरात कोणीच उपस्थित नव्हतं. कारण त्यावेळी सर्व कुटुंबीय घरी परतण्यासाठी रस्त्यात रिक्षाची वाट पाहत उभे होतं. त्यामुळे वाजपेयींच्या कुटुंबीयांचा बराच वेळ रस्त्यावर रिक्षाची वाट पाहण्यात गेल्याने सर्व लोकं घरी पोहोचले तरी स्वतःला घरी परतण्यासाठी स्वतःची गाडी नसल्याने रिक्षाने परतण्यास बराच वेळ गेला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा वायरल होत आहे.

हॅशटॅग्स

BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x