मुंबई : भाजपने काल “साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?” या शीर्षकाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्याचा नादात भाजपचे कॉपीकॅट व्यंगचित्रकार भलतीच ‘कार्टूनगिरी’ करून बसले आहेत. कारण, राज ठाकरेंच्या पाठीमागे ‘मनसे कार्यकर्ते’ दाखविण्याच्या नादात खांद्यावर ‘भगवा गळपट्टा’ परिधान केलेले अनेक वरिष्ठ कार्यकर्ते, ज्यामध्ये अनेकांच्या डोक्यावर केसं कमी टक्कल अधिक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे ते मनसे कार्यकर्त्यांपेक्षा शिवसैनिक असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

वास्तविक या व्यंगचित्रातून उत्तर देण्याच्या नादात भाजपने व्यंगचित्रकार दत्तक घेतले आहेत की “कार्टून” असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण, प्रसिद्ध केलेले व्यंगचित्र पूर्णपणे राज ठाकरे आणि मनसे पक्षाशी संबंधित असताना त्यात ‘मनसे कार्यकर्ते’ दाखविण्याच्या नादात त्यांनी ते शिवसैनिक कसे वाटतील याचीच अधिक काळजी घेतल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच मनसे कार्यकर्ते म्हटल्यावर ते तरुण असल्याचे दाखविणे अपेक्षित असताना, त्यात सर्वाधिक कार्यकर्ते हे वरिष्ठ आणि टक्कल पडलेले दाखविण्यात आले आहेत.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागाचे सर्वाधिक राजकीय दौरे हे राज ठाकरेच करताना दिसत आहेत. दिवाळीपूर्वीच ते पश्चिम आणि पूर्व विदर्भाच्या १० दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते, जिथे त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. त्यामुळे संदर्भहीन व्यंगचित्र प्रसिद्ध करण्याच्या नादात भाजपचे हे दत्तक व्यंगचित्रकार व्यंगचित्रकारितेतील खरे “कार्टून” असल्याचे सिद्ध करत आहेत. परंतु, भाजपच्या या व्यंगचित्रांच्या रणनीतीतून त्यांना राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेली व्यंगचित्र जिव्हारी लागत असल्याचे सिद्ध होत आहे.

BJP issue an cartoon on twitter regarding mns chief raj thackeray and mns workers