17 November 2019 9:26 PM
अँप डाउनलोड

नवा महापौर बंगला: राज ठाकरेंच्या तंबीनंतर शिवाजी पार्क बीएमसी जिमखान्याच्या जागेचा नाद पालिकेने सोडला?

मुंबई : काही दिवसांपासून मुंबई महापौरांच्या नव्या बंगल्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्यांचा दादरच्या शिवाजी पार्कवरील म्युनिसिपल जिमखान्याच्या जागेवर डोळा असल्याची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर आली होती.

दरम्यान, सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन त्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्तांची भेट घेतली होती आणि या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर पालिका प्रशासन कामाला लागले असून त्यांनी शिवाजीपार्कच्या जागेचा हट्ट सोडल्याच वृत्त आहे. त्यासाठी दुसरा पर्याय म्हणून आता महालक्ष्मी रेसकोर्सजवळील १२,००० स्क्वेअर मीटरच्या जागेचा विचार केला जात आहे. संबंधित जागेवर नवा महापौर बंगला बांधणे शक्य आहे का, याची पालिकेकडून पडताळणी सुरु असल्याचे समजते.

त्यामुळे राज ठाकरे यांनी या विषयात वेळीच हालचाल केल्याने अखेर मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवाजीपार्क मधील अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(472)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या