नवी दिल्ली : देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.

त्यानुसार “काँग्रेसने कलम ३५६ चा अनेक वेळा गैरवापर केला आहे. परंतु, नरेंद्र मोदींनी देशातील संस्था नष्ट केल्या: पंतप्रधान,” अशा आशयाचं ट्वीट काल संध्याकाळी पीएमओ इंडिया या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलं. त्यामुळे देशातून मोदींनी दिलेल्या या कबुलीचं कौतुक करत, त्यांना खोचक टोले लगावत विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी वेड्यात काढण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या या ट्विटवरून समाज माध्यमांवर रान पेटले आहे आणि नरेन्द्र मोदींना नेटकऱ्यांनी अक्षरशः फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना मिळणाऱ्या प्रतिक्रिया थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.

नेमकी काय कबुली आहे पंतप्रधान कार्यालयाची आणि त्यावर प्रतिक्रिया?

but narendra modi is destroying institutions says pmo indias over tweet