वसई : सध्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेत एकमेकांवर जोरदार चिखलफेक होताना दिसत आहे. कालच प्रचारादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ टेप भर सभेत ऐकवली. परंतु त्याच ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते आदेश बांदेकरांनी वाचून दाखवलं होतं.
संपूर्ण ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असताना सुद्धा शिवसेनेने तीच क्लिप मोडून- तोडून अर्धवट सादर केली असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, मी स्वतः तो १४ मिनिटांची क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीकास्त्र सोडत खूप जिव्हारी लागणारी टीका केली.
पुढे त्याचाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आदेश बांदेकरांनी सुद्धा लक्ष केलं. कारण त्याच ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते आदेश बांदेकरांनी वाचून दाखवलं होतं. आदेश बांदेकर यांनी वाचून दाखविले होते की, “ही ऑडिओ क्लिप मी पाहिली नाही. भावोजी की कोण ते, शिवसेनेचे नेते, काय नाव त्यांचं? बांदेकर. हो ती क्लिप बांदेकरांनी वाचून दाखवली. मी मनात म्हटलं, अरे मित्रा तू सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहेस. जनाची नाही , निदान मनाची तरी ठेव. सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहे , किमान अध्यक्ष असेपर्यंत तरी खरं दाखव. पूर्ण दाखव. अर्धवट दाखवू नको. पण तो तरी काय करणार, छोटासा माणूस आहे. आदेशच नाव आहे, येतील तेवढ्याच आदेशाने काम करतो.” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
