15 May 2021 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

गुजरात: भाजपच्या माजी आमदाराची गोळ्या झाडून हत्या

गुजरात : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तसेच गुजरात भाजपचे माजी उपाध्यक्ष जयंतीलाल भानुशाली यांची काही अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाची नगरी एक्स्प्रेसमध्ये घडल्याचे वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली सयाची नगरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी प्रवासादरम्यान कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकात काही अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी जाऊन पुढील तपास करत आहेत.

याआधी जयंतीलाल भानुशाली हे गुजरात भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी सुद्धा होते. परंतु, गेल्यावर्षी सुरतमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझाइनमध्ये प्रवेश देण्यासाठी अश्लील व्हिडीओ क्लिप बनवत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते.

हॅशटॅग्स

BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x