19 April 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

मी २०१९ मध्ये पंतप्रधान बनू शकतो: राहुल गांधी

कर्नाटक : २०१९ मधील लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी पंतप्रधान बनू शकतो असं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी प्रथमच जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.

आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी असं उत्तर दिल आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप कडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट आहे, परंतु काँग्रेस कडून कोणाचेच नाव पुढे आले नव्हते.

पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि ‘आरएसएस’कडून देशातील सर्व संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नं केले जात आहेत आणि काँग्रेसने त्यांचे प्रयत्नं हाणून पाडले आहेत असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं.

भाजपने भ्रष्टाचारी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचं तिकीट दिल आहे. तसेच पंतप्रधानांना स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार का मिळाला नाही ? याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रेड्डी ब्रदर्सना तिकीटं का देण्यात आली आहेत. त्याच रेड्डी ब्रदर्सनी करोडोचा घोटाळा करत त्यांनी सामान्यांचे पैसे लुटले असताना भाजपने त्यांना उमेदवारी कशासाठी दिली आहे असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला.

२ कोटी रोजगार निर्माण करण्याचं नरेंद्र मोदींच आश्वासन फोल ठरलं असल्याने त्यांनी तरुणांना त्याच स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते तर नरेंद्र मोदींचे सरकार का देऊ शकत नाही असा प्रश्न सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x