नवी दिल्ली : दिल्ली सध्या किसान क्रांती यात्रेने तापली आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांना भाजप सरकारच्या जुलमी कारवाईला सामोरे जावं लागत आहे. मोर्चेकऱ्यांनी उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात केली होती. दरम्यान त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून पोलिसांकडून तुफान पाण्याचा मारा करण्यात येत आहे.

पोलिसांसोबत आरपीएफ आणि पॅरामिलिटरी तैनात करून पूर्व दिल्लीच्या अनेक भागात कलम १४४ लागू करून जमावबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर्स घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. यूपीच्या सीमेवर सर्व शेतकरी आंदोलक एकत्रं येताच सरकारने जमावबंदी करायला सुरुवात केली आणि मोर्चा दाबण्याचा प्रयत्नं केला.

शेतकऱ्यांचा मोर्चा उलथून लावण्यासाठी यूपीचे सीमेवर इतका पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे की, शेतकरी काय दहशदवादी आहेत काय असा थेट प्रश्न शेतकरी नेते नरेश टीकेत यांनी उपस्थित केला आहे. मागील तीस वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये महेंद्रसिंह टीकेत यांनी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून दिल्ली सरकार हलवलं होत.

kisan kranti morcha reaches to delhi border and government security tightened and angry farmers