29 March 2024 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

नवी मुंबईतील भाजप आमदारांमध्ये वाद टोकाला | आ. मंदा म्हात्रेंचा थेट गणेश नाईकांच्या मतदारसंघात शिरकाव करण्याचा इशारा

MLA Ganesh Naik

नवी मुंबई, २२ सप्टेंबर | नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांचं वाद पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे आणि त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. कारण मंदा म्हात्रे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन, ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक मतदार संघातील कामे करत नाहीत, असा हल्लाबोल केला. थेट पत्रकार परिषद घेऊन हा आरोप मंदा म्हात्रे यांनी केल्याने आता गणेश नाईक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी मुंबईतील भाजप आमदारांमध्ये वाद टोकाला, आ. मंदा म्हात्रेंचा थेट गणेश नाईकांच्या मतदारसंघात शिरकाव करण्याचा इशारा – MLA Ganesh Naik is not doing development work in the constituency said BJP MLA Manda Mhatre in Navi Mumbai :

नवी मुंबईतील दोन्ही भाजपा आमदारांमधील विस्तव मागील काही वर्षापासून जाता जाईना झाला आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही मंदा म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला होता. गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाने सुरु असलेली धुसफूस पुन्हा एकदा टोक गाठताना दिसत आहे. शहरातील दोन्ही आमदारांच्या भांडणात भाजपातील कार्यकर्ते मात्र पिसले जात आहेत. इतकंच नाही तर सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी मला सिमोल्लंघन करून नाईकांच्या मतदारसंघात जावे लागणार असंही मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आहे. ऐरोली विधानसभेत जावून येथील आगरी कोळी लोकांसाठी खाडीकिनारी जेट्टी उभारणार असून इतरही कामे हाती घेणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी जाहीर केले आहे.

गणेश नाईक शिवसेनेतून राष्ट्रवादीत असल्यापासून नवी मुंबई आणि ठाणे या भागातील दिग्गज नेते आहेत. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता होती. 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: MLA Ganesh Naik is not doing development work in the constituency said BJP MLA Manda Mhatre in Navi Mumbai.

हॅशटॅग्स

#GaneshNaik(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x