29 September 2020 2:06 AM
अँप डाउनलोड

सिंधुदुर्ग झेडपी: विषय समिती सभापती निवडणुकीत नितेश राणेंचा काँग्रेस, सेना-भाजपला दणका

सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसने जारी केलेला व्हीप तसेच सेना आणि भाजप युतीची योजना आमदार नितेश राणे यांनी चाणाक्षपणे हाताळून या तिन्ही पक्षांना धक्का दिला आहे. नितेश राणे यांच्या राजकीय कौशल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमानच्या गटाची स्थापना, त्याला घेतलेली अधिकृत मंजुरी, युतीत झालेली फाटाफूट आणि एनसीपीच्या सदस्याला आयत्यावेळी पक्षात दिलेला प्रवेश, या सर्व रणनीतीपुढे काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला अक्षरशः पराभव स्वीकारावा लागला आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एकहाती वर्चस्व सिद्ध झाले आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावण्या आधीच आमदार नितेश राणेंनी ‘स्वाभिमान’च्या गटाची स्थापना केली होती. २८ सदस्यांचा गट करुन सतीश सावंत यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतर या गटाला जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मंजुरीही घेण्यात आली होती. सभापती निवडणुकीच्यादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या किंजवडे जिल्हा परीषद मतदार संघाच्या सदस्या मनस्वी महेश घारे तसेच बापर्डे जिल्हा परीषद मतदार संघाचे सदस्य गणेश राणे हे अनुपस्थित राहिले. दरम्यान, आमदार नितेश राणेंनी पडद्याआड राहून युतीचा गड भेदल्याची चर्चा स्थानिक राजकिय विश्लेषकांमध्ये रंगली आहे. त्यात सभापती निवडणुकीच्या काही दिवस आधी एनसीपीच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनिशा दळवी यांचा ‘स्वाभिमान’ मध्ये आयत्यावेळी अधिकृत प्रवेश करुन घेण्यात आला होता.

‘स्वाभिमान’चे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांच्या आदेशाने जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला शिक्षण व आरोग्य सभापतीपदी विराजमान होण्याची पहिली संधी मिळाली आहे. दरम्यान, सदर पदासाठी दोडामार्गच्या अनिशा दळवी यांची निवड झाली. त्यांनी शिवसेनेचे राजू कविटकर यांचा २८ विरूद्ध २० मतांनी पराभव केला. वित्त व बांधकाम सभापती पदाच्या निवडणुकीत स्वाभिमानचे जेरॉन फर्नांडिस यांनी शिवसेनेचे प्रदीप नारकर यांचा २८ विरूद्ध २० मतांनी पराभव केला. महिला व बाल कल्याण सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ‘स्वाभिमान’च्या पल्लवी राऊळ यांनी पराभव केला. समाज कल्याण सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी जाधव यांचा २८ विरूद्ध २० मतांनी पराभव करत ‘स्वाभिमान’चे अंकुश जाधव विजयी झाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x