30 April 2025 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा
x

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यावर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून ६ दिवसांच्या बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होणार असून तिथे निरनिराळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश, तसेच कार्यकर्त्यांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यानंतर ३१ तारखेला बीड येथे शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार येईल. त्यानंतर ते केज’करीत रवाना होतील आणि तेथे सुमंत धस यांच्या कार्यक्रमात हजेरी लावतील आणि नंतर दिंद्रुड येथे एका पक्ष कार्यालयाचे उदघाटन करून ते धुळे जिल्ह्याच्या दिशेने रवाना होतील.

धुळे दौऱ्यादरम्यान, धुळे इंडियन मेडिकल हॉलमध्ये पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शाहूमहाराज नाट्यगृह धुळे येथे महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून राज ठाकरे त्या मेळाव्याला संबोधित करतील. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी, त्यांच्या मतदारसंघात बांधलेल्या स्टेडियमच्या उदघाटन कार्यक्रमास रवाना होतील, असं पक्षाचे सचिव सचिन मोरे यांनी कळवलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या